कोगील खुर्द गाव हे कोल्हापुर पासुन 18 कि.मी. अंतरावर असुन गावातील पुरुष संख्ये पेक्षा महिला संख्या जास्त आहे. गावचे मारूती देवालय हे ग्रामदैवत असुन एकुण गावात 2 सोसायट्या व 1 डेअ-या आहेत. गावात 1 ली ते 7 वी पर्यंत प्राथमिक शाळा असुन सध्या हायस्कुलची आवश्यकता आहे. पिण्याच्या पाण्यासाठी 1 सार्वजनीक विहिरी आहे.
ग्राम पंचायत सदस्य संख्या 9 असुन त्यापैकी सरपंच पदावर महिला आहे. गावातील प्रमुख व्यवसाय शेती व पशुपालन असुन गावानजीक एम.आय.डी.सी. असलेने औद्योगिक क्षेत्रात रोजगार उपलब्ध आहे. गावातील डोंगर भाग व गायरान क्षेत्रामध्ये साग व निलगिर या वृक्षांची लागवड केली आहे. महिला सबलीकरणाच्या दृष्टीने बचतगटा मार्फत पापड, लोणचे, मेनबत्ती, कापुर इ. वस्तू तयार करून त्यांची विक्री केली जाते.
गरीबी निवारणासाठी व रोजगारासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मजुर नोंदणी करुन घेतली आहे. गावात सर्व समाजाचे लोक रहात असुन तंट्याचे प्रमाण कमी असुन, लोक सहभागातुन दरवर्षी संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत गावातील स्वच्छता केली जाते. सांडपाण्याची व्यवस्था गटर मार्फत केली आहे.
गावात एकुण दोन तलाव आहेत. यशवंत ग्राम समृध्दी योजना, 12 वा वित्त आयोग व आमदार फंडातुन रस्ते व गटर झाले आहेत. दवाखान्याची सोय नसल्याने गावात उपकेंद्राची आवश्यकता आहे. प्राथमिक शाळा मैदानात चाफा, पळस, निलगीर , गुलमोहर, पाम इ. झाडांची लागवड केली आहे. प्रत्येक महिन्यात तंटा मुक्तीची मिटींग घेतली जाते. गावामध्ये 9 तरूण मंडळे आहेत व 11 महिला बचत गट आहेत. गावाला निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला आहे. तसेच दर वर्षी मरगाबाई देवालय येथे पारायण सोहळा करुन महाप्रसाद दिला जातो. गावात बरेच स्वातंत्र्य सैनिक आहेत.